आता ग्रामपंचायत मिळकतीवर बोजा नोंदवून कर्ज घेता येणार
आता ग्रामपंचायत मिळकतीवर बोजा नोंद करून बँक / पतसंस्था यांचेकडून कर्ज घेता येणार असून याबाबत नुकताच शासन निर्णय ही प्रसिद्ध करण्यात आला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेला बँकेची मूल्य मान्यता देण्यात आली असून ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता वरती आता कर्ज घेणे शक्य झाले आहे.
दि .६ डिसेंबर , २०१७ च्या शासन पत्रान्वये ग्रामपंचायत नमुना नं . ८ वर सहकारी संस्थांचे भार / कर्ज / बोजा नोंदविता येणार नाही , असे कळविण्यात आले होते . तथापि , ग्रामीण भागात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून सर्व गावात प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नाहीत.यासाठी स्वामित्व योजनेद्वारे कार्यवाही सुरू आहे.ल्यास अजून अवधी लागणार असल्याने गावातील लोकांना कर्ज घेण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याने ग्रामपंचायत नमुना नं .८ हा मालकी हक्क दर्शविणारे दस्त नसले तरी मालकाच्या नावाची नोंद ग्रामपंचायत नमुना नं . ८ वर असते.त्यामुळे दि .६ डिसेंबर , २०१७ रोजीचे शासन पत्र रद्द करून ग्रामपंचायत नमुना नं .८ वर बोजा लावण्यास अनुमती देण्यात येत आहे .असा आदेश काढण्यात आला आहे.
Post Comment
No comments